27 June 2024

20 सेकंदाची मिठी अन् 6 सेकंद... तिच्या नजरेत हिरो व्हा!

Mahesh Pawar

स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जगात वावरताना कामाच्या व्यापाचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावरही जाणवतो.

पती-पत्नी असो की गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोघांच्या नात्यात प्रेम, जिव्हाळा नसेल तर यशाच्या शिखरावर पोहचूनही आनंद मिळत नाही.

वाढता तणाव आणि निराशा ही गोष्ट नात्यात दूरावा निर्माण करण्याचे कारण ठरते. त्याचा सामना करण्यासाठी काही रुल्स फायद्याचे ठरतात.

जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारणे आणि 6 सेकंद किस करणे हा फॉर्म्युला कपल्सच्या नात्यातील गोडवा आणण्यासाठी फायदेशीर ठरतो.

या गोष्टी नात्यात कसा बदल घडवून आणू शकतात. त्यात कोणत्या फायद्याच्या गोष्टी दडल्या आहेत याची माहिती घेऊ.

हा फॉर्म्युला एकमेकांमधील आपलेपणाची भावना  वाढवतो. या नियमाला शास्त्रीय लॉजिक आणि रिसर्चचा आधार आहे.

6 सेकंद किस केल्याने ऑक्सीटोसिनमध्ये वाढ होते. ज्याला ‘लव हार्मोन’ म्हणतात. यामुळे दोघांमध्ये आपुलकी, प्रेम, विश्वास, संबंध आणि जवळीक वाढते.

जोडीदाराला किमान 6 सेकंदपर्यंत किस करता तेव्हा कोर्टिसोलचे प्रमाण कमी होते. यामुळे तुम्हाला अधिक शांत आणि आनंदी वाटते.

एकमेकांना जास्त वेळ किंवा 20 सेकंद मिठीत घेतल्याने ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. यामुळे जोडीदारासोबत अधिक जवळीक वाढते.

जोडीदाराला अधिक वेळेसाठी मिठीत घेता तेव्हा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे.

जास्त वेळेसाठी जर जोडीदाराला मिठीत घेतले तर मानसिकरित्या फायदा होऊ शकतो. यामुळे जोडीदाराला त्याच्या सुरक्षिततेची जाणीव होते.

तुम्ही तुमच्या जोडीदारासह सतत सोबत आहात याची त्याला जाणीव होते. याचा फायदा नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते.

नेहमी आणि अधिक वेळेपर्यंत मिठी मारल्याने तुमची प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होऊन प्रतिकारक शक्ती सुधारते.

20 सेकंद मिठीत घेतल्याने आजारपणाशी लढण्याची ताकद मिळते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती अधिक सक्षम होते.