18 APRIL 2024

आई व्हायचंय! 46 वर्षीय अभिनेत्रीने व्यक्त केली लग्नाची इच्छा

Mahesh Pawar

'झलक दिखला जा' कार्यक्रमात अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.

46 वर्षीय तनिषा मुखर्जी अनेक चित्रपट आणि रिॲलिटी शोमध्ये सक्रिय आहे. सध्या ती 'लव्ह यू शंकर' या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे आहे. 46 वर्षांची तनिषा ऑनस्क्रीन आई झाली आहे.

तनिषा मुखर्जी हिचे अद्याप लग्न झालेले नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने 'हा अनुभव घ्यायचा आहे पण सध्या तिच्या आयुष्यात कोणी नाही.' असे म्हटले.

तनिषा हिला लग्न करून मुलाची आई व्हायचे आहे. पण, लग्नासाठी तिला अजून कोणी सापडलेले नाही ही तिची अडचण आहे.

मुलाखतीमध्ये ती म्हणते, आई होण्याचा अनुभव खूप गोड असतो. मला मुलं आवडतात. मला माझ्या आयुष्यात हा अनुभव घ्यायचा आहे.

दुर्दैवाने लग्नासाठी योग्य मुलगा सापडला नाही. त्यामुळे हे सुख मला घेता येत नाही.

परंतु, त्याचा फायदा मी पडद्यावर घेतला. मी मुलाबरोबर खूप मजा केली, त्याला छेडले, त्याच्याबरोबर खेळले, सर्व काही चालू होते असे ती म्हणाली.

आव्हाने आणि टीकेबाबत ती म्हणते, मला टीका विनाकारण वाटत असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करते. मला ते योग्य वाटत असेल तेच मी करते.