11 March 2024
Mahesh Pawar
जगात अशा अनेक नद्या आहेत ज्यांचा त्या त्या देशांच्या विकासात मोठा वाटा आहे. नद्यांचे वाहणारे प्रवाह पाहून मनाला खूप शांती मिळते.
आपल्या देशात नद्यांना सामाजिक, आर्थिकसोबत पौराणिक महत्त्व आहे. पृथ्वीवर अशा काही नद्या आहेत ज्या जमिनीखालून वाहतात.
मेक्सिकोमधील कारमेन शहराजवळील रिओ सेक्रेटो नदी 38 किलोमीटर लांबीच्या गुहेच्या आतमधून वाहते.
Labouich नदीचा प्रथम शोध 1906 मध्ये लागला. ही युरोपमधील सर्वात लांब भूमिगत नदी आहे.
कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नार्डिनो पर्वत आणि मोजावे वाळवंटात मोजावे नदी वाहते. या नदीचा बहुतांश प्रवाह भूमिगत आहे.
अमेरिकेतील इंडियाना येथेही एक भूमिगत नदी आहे, जी 'मिस्ट्री रिव्हर' म्हणून ओळखली जाते.
फिलीपिन्सच्या नैऋत्य भागात पोर्तो प्रिन्सेसा नदी ही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.
ही नदी जमिनीखालच्या गुहांमधून वाहत जाऊन समुद्राला मिळते.
झेक प्रजासत्ताकमधील पुंकवा नदीचा प्रथम शोध 1723 मध्ये लागला. 30 किलोमीटर लांबीच्या नदीपैकी बहुतांश नदी ही जमिनीखालून वाहते.
पोर्तो रिको मधील रिओ कामू नदी ही जगातील तिसरी सर्वात मोठी भूमिगत नदी आहे.