29 March 2024

भारतातील असं स्मशान जिथे हिंदू प्रेतांना दफन केलं जातं!

Mahesh Pawar

प्रत्येक धर्मामध्ये मृत शरीरावर अंतिम संस्कार करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत.

हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानला गेल्याने मृत शरीराचे दहन करणे इष्ट समजलं जातं.

पण, भारतात असे एक ठिकाण आहे जेथे हिंदू धर्मीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला अग्नी न देता जमिनीत दफन केले जाते.

कानपूर शहरामध्ये हे स्मशान आहे. खर तर याला स्मशान न म्हणता कब्रीस्तान असंच म्हटले जाते.

येथे अनेक वर्षांपासून हिंदू धर्मातील पारंपारिक प्रथेला बगल देत मृत शरीर दफन करण्याची पद्धत रूढ आहे.

1930 साली स्वामी अच्युतानंद हे कानपूरमध्ये वास्त्यव्यास होते. दलित कुटुंबातील एका लहान मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी ते गेले.

अंतिम संस्कार करणारे पंडित मोठ्या दक्षिणेची मागणी करत होते. पण, ते दलित कुटुंब तेवढी दक्षिणा देण्यास असमर्थ होते.

या कारणामुळे त्यांच्या मुलाचे प्रेत अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत तसेच पडून होते. ही असंवेदनशीलता पाहून स्वामी अच्युतानंद व्यथित झाले.

स्वामी अच्युतानंद यांनी पुढाकार घेत त्या लहान प्रेतावर अंतिम संस्कार करून त्याचे शव गंगा नदीमध्ये सोडून दिले.

स्वामी अच्युतानंद यांनी इंग्रज प्रशासकांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा इंग्रजानी गरिब आणि दलितांना स्मशानासाठी जागा दिली.

तेव्हापासून या स्मशानामध्ये प्रेताला अग्नी देण्याऐवजी ते जमिनीत पुरण्याची प्रथा सुरु झाली, जी आजतागायत सुरु आहे.

स्वामी अच्युतानंद यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे शव देखील जाळण्याऐवजी याच स्मशानभूमीमध्ये दफन करण्यात आले.