14 March 2024

ऐतिहासिक वारसा जपत मन शांत करणारं असं ‘एक’ ठिकाण

Mahesh Pawar

समुद्रापासून ते बर्फापर्यंत आणि वाळवंटापासून ते घनदाट जंगलांपर्यंत सगळ्यांचीच रेलचेल आपल्या देशात आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू सुद्धा आपल्या देशात ठिकठिकाणी दिमाखात उभ्या आहेत.

असंच एक पर्यटनस्थळ आहे ते म्हणजे कर्नाटक राज्यातील हंपी हे शहर

विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हंपी हे शहर तिथल्या नितांत सुंदर देवळांसाठी प्रसिद्ध आहे.

काही वर्षांपूर्वी ह्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले गेले होते.

गोलाकार डोंगरांच्या मधोमध वसलेले हंपी हे स्थळ म्हणजे एक जागतिक वारसा स्थळ आहे. इथले विरुपाक्ष मंदिर जगप्रसिद्ध आहे.

ह्या ठिकाणी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली 1000 मंदिर आणि स्मारके आहेत.

1565 साली झालेल्या तालिकोटच्या युद्धात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हे शहर उध्वस्त केले होते.

तरीही हे अवशेष आजही समृद्ध इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत.

तुंगभद्रा नदीला पूर्वी पम्पा नदी म्हणत असत. त्यावरून या शहराला हंपी हे नाव पडले. 

इथल्या विठ्ठल मंदिर परिसरातील मुख्य हॉलमध्ये असलेल्या 56 स्तंभांवर हातांनी मारले असता त्यांतून संगीताच्या लहरी निघतात.

हंपीला आल्यावर पर्यटक मंदिरे, स्मारके शिवाय रॉक क्लाइंबिंग आणि बास्केट बोटचा आनंद घेऊ शकतात.