26 May 2024

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्यात दुरावा? हेमा मालिनी यांनी सांगितले कारण...

Mahesh Pawar

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र या दोन प्रसिद्ध स्टार्सचे लग्न 2 मे 1980 रोजी झाले.

धर्मेंद्र हे आधीच विवाहित होते पण त्यांचे मन हेमा यांच्यावर जडले होते.

मात्र, लग्नानंतर लवकरच ते दोघेही वेगळे राहू लागले. 40 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी दोघेही वेगळ्या घरात राहत होते.

अलीकडेच हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीमध्ये एक मोठा खुलासा केला आहे.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. हेमासोबत लग्न झाल्यानंतरही ते प्रकाश कौर आणि मुलांसोबत रहात होते.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना देओल या दोन मुली झाल्या. पण, हेमा आपल्या मुलींसह वेगळ्या घरात आहे.

हेमा मालिनी या मुलाखतीमध्ये म्हणाली, धर्मेंद्रला प्रभावित करण्यासाठी कधीही काहीही केले नाही.

धरमजींना खूश करण्यासाठी मला कधीही जेवण बनवावे लागले नाही, आम्ही दोघेही कामात खूप व्यस्त होतो.

दोन्ही मुली शाळेत जायला लागल्यानंतर स्वयंपाक शिकायला सुरुवात केली.