13 May 2024
Mahesh Pawar
किंग खान शाहरुख याचा 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता.
शाहरुख खान याच्यासोबत या चित्रपटात दीपिका पदुकोणही दिसली होती.
'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये खलनायकची भूमिका करणारा निकितिन हा सुद्धा प्रसिद्ध झाला होता.
निकितिन याने या चित्रपटात खलनायक थंगाबलीची भूमिका केली होती.
निकितिन धीर याच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.
चित्रपटाच्या यशामुळे निकितिन याला आणखी काम मिळू लागेल असे वाटत होते.
परंतु, 'चेन्नई एक्स्प्रेस' नंतर त्याच्यासोबत असे काहीच अजिबात घडले नाही.
निकितिन धीर यांना त्यानंतर तब्बल 11 महिने कोणतेही काम मिळाले नाही.
साऊथ इंडस्ट्रीकडूनही त्याला कोणत्याही प्रकारच्या ऑफर आल्या नाहीत.