29 March 2024

एक अभिनेत्री ठरली दोन सुपरस्टारच्या मारहाणीचे कारण, काय घडलं? 

Mahesh Pawar

बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया हिच्यासोबत लग्न केले.

मात्र, त्याआधी त्यांचे नाव आणखी एका अभिनेत्रीशी जोडले गेले होते. ते दोघेही एकमेकांना अनेक वर्षे डेट करत होते.

राजेश खन्ना यांच्यासोबत तेव्हा आणखी एक नाव बॉलीवूडमध्ये गाजत होते. ते  म्हणजे लव बॉय संजीव कुमार...

परंतु, एका अभिनेत्रीवरून या दोघांमध्ये खूपच बिनसले होते. त्यावरून एकदा राजेश खन्ना यांनी संजीव कुमार यांना कानशिलात लगावली होती.

ज्या अभिनेत्रीवर प्रेम होते तिलाच संजीव कुमार डेट करत असल्याचे राजेश खन्ना यांना समजले. तेव्हा त्यांना राग अनावर झाला होता.

डिंपल कपाडिया हिच्यासोबत लग्न होण्यापूर्वी राजेश खन्ना यांचे अभिनेत्री अंजू महेंद्रूसोबत अफेअर होते.

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू हे सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण, अंजू यांनी  काकांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. यानंतर दोघे वेगळे झाले.

या दोघांच्या ब्रेकअपनंतर अंजू यांचे नाव संजीव कुमार यांच्याशी जोडले गेले. पण, ही केवळ अफवा होती.

वास्तविक अंजू महेंद्रू हिची आई यांनी संजीव कुमारला भाऊ मानले होते. त्यांना राखीही बांधली होती.

त्यामुळे अंजू महेंद्रू आणि संजीव कुमार यांच्यात मामा आणि भाचीचे नाते होते. मात्र, हे नाते समजून न घेता राजेश खन्ना चिडले होते.

काकांना काही वर्षानंतर संजीव कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपला राग काढला.

ईर्षेने पेटलेल्या राजेश खन्ना यांनी चित्रपटात एक सीन दरम्यान संजीवकुमारला जोरदार कानशिलात लगावली.