26 May 2024

फराह खान करोडपती अभिनेत्याच्या प्रेमात, पतीच्या परवानगीवर दिले असे उत्तर...

Mahesh Pawar

सुप्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला यांना तीन मुले आहेत.

2004 मध्ये त्यांनी शिरीष कुंदर यांच्याशी लग्न केले. पण, नुकतेच फराह यांनी केलेला खुलासा ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

फराह खान यांनी कपिल शर्मा शोमध्ये हा खुलासा केलाय. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता अनिल कपूरही होते.

कपिल शर्माने अनिल कपूरला कोणत्या हॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्याच्या अफेअरच्या बातम्या ऐकायला आवडेल असे विचारले.

त्यावर अनिल कपूर बोलण्याआधीच फराहने म्हटले की, ते सगळे अभिनेत्रीसोबत आहेत.

फराहच्या उत्तराला अनिलने सहमती दिली. नंतर कपिलने फराहलाही हाच प्रश्न विचारला.

त्या प्रश्नावर फराह हिने लगेच उत्तर दिले, 'टॉम क्रूझ'. फराह म्हणाली की तिला टॉम खूप आवडतो.

फराह हिने आपल्या मुलाची परवानगीही घेतली आहे. तिचे हे उत्तर ऐकून सगळेच अवाक् झाले.

फराहचे हे शब्द ऐकून शोच्या जज अर्चना पूरण सिंह म्हणाल्या की, पती शिरीष कुंदर यांचीही परवानगी घे. 

त्यावर फराह म्हणाली की, तिचा नवरा खूप दिवसांपासून सांगत होता की काहीतरी करून जा.