18 MAY 2024

विमान उड्डाणात वैमानिक आपला वेळ कसा घालवतात?

Mahesh Pawar

विमानाचे साधारणतः 14 तासांचे उड्डाण हे लांब पल्ल्याचे किंवा मोठ्या अंतराचे उड्डाण मानले जाते.

विमान सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने चालवण्यासाठी अशा वेळी एकापेक्षा जास्त वैमानिकांची आवश्यकता असते.

लांब पल्ल्याच्या उड्डाणामध्ये किमान दोन पायलट असतात. कधी तीन किंवा चार वैमानिक असतात.

उड्डाणाच्या पहिल्या 30 आणि शेवटच्या 45 मिनिटांमध्ये सर्व वैमानिक नियंत्रण कक्षात असतात.

मोठ्या अंतराच्या उड्डाणांमध्ये वैमानिकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. 

प्रदीर्घ कालावधीसाठी लक्ष केंद्रित करणे, तणावावर मात करणे, विमानाच्या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवणे यांचा समावेश होतो.

यामुळे वैमानिक सदैव ताजेतवाने रहावे म्हणून इतर वेळात ते सर्व आळीपाळीने विश्रांती घेत असतात.

लांब पल्ल्याच्या विमानांमध्ये त्यांच्या विश्रांतीसाठी दोन बंक बेड आणि दोन जागा असलेली छोटी आसने असणारी छोटी केबिन असते. 

या केबिनमधे विश्रांतीबरोबरच मनोरंजनाची व्यवस्था असते. येथे ते गप्पा मारू शकतात, संगीत ऐकणे किंवा पुस्तके, मासिके वाचू शकतात.

पण, त्यांनी नेहमी सजग राहणे, उड्डाणाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केबिन क्रू बरोबर संवाद राखणे अपेक्षित असते.

मात्र, वैमानिक त्यांच्या मोकळ्या वेळेत मद्य किंवा कोणतीही औषधे घेऊ शकत नाहीत.