3 May 2024

'शोले'साठी अमिताभ बच्चन यांना किती मिळाले होते मानधन? जयाची फी ऐकून हसूच येईल 

Mahesh Pawar

1975 साली बॉलिवूडच्या इतिहासात 'शोले' सिनेमाची एक अनोखी कहाणी लिहिली गेली.

भारतातील 100 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 25 आठवड्यांहून अधिक काळ चालणारा हा सिनेमा.

शोलेमध्ये धर्मेंद्र, संजीव कुमार, अमिताब बच्चन, हेमा मालिनी, जया भादुरी, अमजदखान अशी बडी स्टार मंडळी होती.

'शोले'मधील 'वीरू'च्या भूमिकेसाठी अभिनेता धर्मेंद्र यांना 1 लाख 50 हजार रुपये मानधन मिळाले होते.

‘ठाकूर बलदेव सिंग’ म्हणजेच संजीव कुमार यांना 1 लाख 25 हजार रुपये मिळाले होते.

'जय' च्या भूमिकेसाठी अमिताभ यांना एक लाख रुपये तर 'बसंती'च्या भूमिकेसाठी हेमा मालिनी यांना 75 हजार रुपये मिळाले होते.

‘गब्बर’ या अजरामर भूमिकेसाठी अमजद खान याला 50 हजार रुपये फी मिळाली होती.

अभिनेत्री जया भादुरी यांना 'राधा'च्या भूमिकेसाठी 35 हजार रुपये मिळाले. तर जेलर असरानी यांना केवळ 15,000 रुपये दिले होते.

विजू खोटे यांना 10,000, मॅक मोहन 12,000 आणि ए. के. हंगल यांना केवळ 8,000 रुपये मिळाले होते.

बॉक्स ऑफिसवर शोले हा सर्वात मोठा व्यावसायिक यश ठरला. दिग्दर्शन, अभिनय आणि इतर अनेक पैलूंसाठी याने प्रशंसा मिळवली.