23 May 2024

सलमान खान नाही तर 'झक्कास' अभिनेता करणार 'बिग बॉस OTT 3 होस्ट   

Mahesh Pawar

ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती वेळ अखेर आली आहे. हो! 'बिग बॉस ओटीटी 3' लवकरच सुरू होणार आहे.

सलमान खानच्या वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3' चा प्रोमो रिलीज झाला आहे.

या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या जुन्या सीझनची अनेक झलक दाखवण्यात आली आहेत.

गेल्या सीझनमध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं ते फक्त ट्रेलर असल्याचंही प्रोमोत सांगण्यात आलंय.

म्हणजेच यावेळी 'बिग बॉस सीझन 3' सर्वात प्रेक्षणीय असणार आहे.

त्याचवेळी, प्रोमोच्या शेवटी एक शब्द वापरण्यात आला आहे. ज्यामुळे हा शो आता सलमान खान नाही तर दुसरा अभिनेता होस्ट करणार आहे असे दिसते.

प्रोमोच्या शेवटी 'झक्कास' हा शब्द आहे. यामुळे अनिल कपूर यावेळी शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे असे दिसतयं.

'बिग बॉस ओटीटी'चे दोन्ही सीझन जिओ सिनेमावर मोफत दाखवण्यात आले होते. पण यावेळी तसे होणार नाही.

'बिग बॉस ओटीटी सीझन 3' पाहण्यासाठी आता 29 रुपयांमध्ये जिओ सिनेमाचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.