12 March 2024

फक्त एक चमचा विष, ज्यात आहे अख्खा देश संपवण्याची ताकद, औषध म्हणून होतोय वापर

Mahesh Pawar

जगात सायनाईड हे सर्वात प्राणघातक विष समजले जाते. पण, त्याहीपेक्षा एक भयानक विष आहे.

याचे फक्त एक चमचा विष हे ब्रिटनसारख्या संपूर्ण देशाला तर काही किलो विष पृथ्वीवरील संपूर्ण मानवी लोकसंख्या नष्ट करण्यासाठी पुरेसे आहे.

क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या बॅक्टेरियापासून हे विष तयार होते. याचा एक थेंबही जीव जाण्यास पुरेसे आहे.

बोटुलिनमपासून बोटॉक्स नावाचे औषध तयार करण्यात येते. याचा इंजेक्शन म्हणून अत्यंत सौम्य प्रमाणात वापर केला जातो.

चेहऱ्यावरील सुरकुत्या मिटवण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. यासाठी बोटोक्सने एफडीएची मान्यता घेतली आहे.

याशिवाय एफडीएने बोटॉक्सला अनेक गंभीर क्लिनिक संशोधनानंतर सुरक्षित आणि प्रभावी घोषित केले आहे.

मान गळणे, हाताला घाम येणे, मायग्रेन, लघवीचा त्रास आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या यावर औषध म्हणून याचा वापर केला जातो.

हात थंड पडणे, पाठदुखी, वेदनादायक लैंगिक संबंध, नैराश्य, जास्त लाळ, पुरळ यावरील औषधात बोटोक्स वापरले जाते.

पण, बोटॉक्सच्या उपयोगानंतर शरीराच्या अन्य काही भागात समस्या उद्भवू शकतात.

काही प्रकरणांत शरीर कमजोर होणे, दृष्टी जाणे, श्वास घेण्यात अडचण यासारखी काही लक्षणे दिसतात.