06 June 2024

अयोध्यावासी ' 'विश्वासघातकी कट्टप्पा', निकाल पाहून 'लक्ष्मण' संतापला

Mahesh Pawar

लोकसभा निवडणुक 2024 चे निकाल पाहून 'रामायण' मालिकेतील लक्ष्मण म्हणजेच सुनील लाहिरी नाराज झाले आहेत.

फैजाबाद (अयोध्या) येथून सपाचे अवधेश प्रसाद विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे लल्लू सिंह यांचा पराभव केला आहे.

अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. निवडणुकीतही भाजपने हा मुद्दा घेतला होता.

भाजप उमेदवारच्या झालेल्या या पराभवामुळे सुनील लाहिरी यांनी अयोध्येतील लोकांवर राग व्यक्त केला आहे.

सुनीलने इन्स्टावर अनेक पोस्ट शेअर करून अयोध्येतील लोकांनी भाजपचा विश्वासघात केला अशी खिल्ली उडवली आहे.

जसे कट्टप्पाने बाहुबलीला फसवले त्याचप्रमाणे अयोध्येतील जनतेनेही भाजपच्या पाठीत वार केला याची एक मीम सुनीलने पोस्ट केली आहे.

हे तेच अयोध्यावासी आहेत ज्यांनी वनवासातून आल्यानंतर माता सीतेवर संशय व्यक्त केला होता अशी टीका त्यांनी केलीय.

इतिहास साक्षी आहे की अयोध्येतील जनतेने नेहमीच आपल्या खऱ्या राजाशी विश्वासघात केला आहे. ठीक आहे.

अयोध्येतील लोकांनी माता सीतेला सोडले नाही, तेव्हा राम मंदिर बांधणाऱ्यांचा विश्वासघात करण्यात काय मोठी गोष्ट आहे असे सुनीलने म्हटले.

हिंदू हा असा समाज आहे जो देवालाही नाकारतो. भारत तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहणार नाही असे त्याने लिहिले आहे.

सुनीलच्या या पोस्टवरून भाजपने अयोध्या गमावल्यामुळे किती दु:ख झाले आहे हे दिसून येते.