9 March 2024

अंबानींच्या पार्टीत हरवली मार्क झुकरबर्गच्या पत्नीची अत्यंत महागडी वस्तू, साडे तीन तास शोध सुरु पण...

Mahesh Pawar

फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला हजेरी लावली होती.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्यक्रमात हे जोडपे खूपच सुंदर दिसत होते.

यातही प्रिसिला चॅन विशेष सुंदर दिसत होत्या. याचे कारण म्हणजे त्यांनी पार्टीची थीम लक्षात घेऊन तसे पोशाख निवडले होते.

तिच्या प्रत्येक लूकमध्ये ग्लॅमर ते ड्रामा याचा घटक स्पष्टपणे दिसत होता. ज्यामुळे माध्यमांनी तिची दखल घेण्याची एकही संधी सोडली नाही.

कॉकटेल पार्टीच्या रात्री मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी सुपर स्टायलिश असा काळ्या रंगाचा पोशाख निवडला होता.

दुसऱ्या दिवशी प्रिसिला चॅनने भारतीय फॅशन डिझायनर राहुल मिश्रा यांच्या वेरड्यूर कलेक्शनमधून सोनेरी रंगाचा लेहेंगा निवडला होता.

हा लेहेंगा अतिशय अनोख्या डिझाइनसह होता. या सेटच्या क्रॉप टॉपमध्ये 'किसिंग क्रेन' बनवल्या होत्या. त्यावर सोनेरी रंगाचे चमकदार काम होते

तिसऱ्या दिवशी तिने निळ्या रंगाची साडी निवडली होती. साडीवर रेशमी धाग्यांनी बनवलेली फुलांची रचना होती.

सुंदर लुक पूर्ण करण्यासाठी प्रिसिला चॅनने हातात बांगड्यांसह डायमंड जडलेला नेकपीस घातला होता.

अंबानी यांच्या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी प्रिसिला चॅन हिचे मौल्यवान पेंडेंट हरवल्याच्रे समोर आले. त्यानंतर संपूर्ण पार्टीत गोंधळ उडाला होता.

हे पेंडंट प्रिसिलाचे अत्यंत आवडते आणि महागडे होते. हे पेंडंट शोधण्यात साडे तीन तास घालवले. पण काही उपयोग झाला नाही.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी