18 March 2024

काटेरी असले तरी औषधी, अनेक आजारावर गुणकारी, जाणून घ्या निवडुंगाचे फायदे 

Mahesh Pawar

निवडुंग ही फार दिव्य औषधी आहे. याच्या कडांवर काटे असतात. निवडुंग तोडला तर त्यातून पांढरा दाट असा चीक निघतो.

पूर्वी प्लेगच्या गाठीवर चीक लावून त्यावर निवडुंग बांधत असत. त्यामूळे प्लेग बरा होत असे.

पुष्कळ दिवस ताप असेल तर निवडुंगाच्या चिकाचे चार थेंब भाजलेल्या हरभऱ्या डाळीच्या पिठात घालून गोळ्या करून खाव्या. 

भूक लागत नसल्यास निवडुंगाचे चीक हरभऱ्याच्या पीठात कालवून गोळी करून खावी.

निवडुंगाच्या चिकाचे लहान 5 थेंब साजूक तूप साखरेत घालून त्याची गोळी करून दिली असता अंगात शक्‍ती येते.

हृदयरोगावरही ही गोळी घेतली असता हृदयात येणारी कळ थांबते.

लघवीतून पू जाने, लघवी होण्यास अडचण पडते अशा विकारात चण्याच्या पिठात एक ग्रॅम चिक घालून गोळ्या करून खावी.

डांग्याखोकला झाल्यास निवडुंगाचा चीक लोण्यामध्ये टाकून त्याचे चाटण द्यावे. कफ पडून घसा मोकळा होऊन डांग्या खोकला कमी होतो.

दम्यामध्ये लोण्यामध्ये निवडुंग चिकाचे दोन थेंब टाकून चाटले असता दमा विकारात आराम पडतो.

मूतखड्यात निवडुंगाचा तीन थेंब चीक दुधातून घ्यावा. शौचास साफ होऊन लघवी होते. लघवीची कळ थांबते.

साधी आणि कसलीही पोटदुखी निवडूंगाचा चीक घेतल्याने बरी होते. पोटफुगी कमी होते. निवडुंगाच्या चिकाचा मुख्य उपयोग साफ शौचशुद्धी आहे.

कोठेही सूज आलेली असो निवडुंग ठेचून, बारीक वाटून कोमट सुजेवर बांधल्याने सूज कमी होते. सुजेवर हे रामबाण औषध आहे.

जखमेत घाण झाली असेल, किडे पडले असतील तर निवडुंग वाटून कोमट करून बांधावे किडे नाहीसे होतात.