12 March 2024

भारतात या नोकरीत मिळतो सर्वात जास्त पगार, तो ही आहे करमुक्त

Mahesh Pawar

भारतीय नौदल (Navy)  हे भारतातील सागरी सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम करते.

पूर्ण जगामध्ये समुद्रामार्गे माल ने-आण करण्याचे काम व्यापारी नौदल (Merchant Navy) करते.

भारतात सर्वात जास्त पगार व्यापारी नौदल (Merchant Navy) या क्षेत्रात मिळतो आणि तो सुद्धा करमुक्त आहे.

ज्याला देश, विदेशात फिरायची आवड आहे. भरपुर पैसे कमवायचे आहेत त्यांनी या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करण्यास हरकत नाही.

व्यापारी नौदलातील डेक कॅडेट या रँकसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 ते 12 वी इतकी आहे. 19 ते 21 वर्षाचे तरुण येथे भारती होऊ शकतात.

डेक कॅडेटचा सेवा कालावधी 1 ते 2 वर्षे असतो. त्यांना दर महा ₹ 40,000 ते ₹ 50,000 इतका पगार मिळतो.

थर्ड ऑफिसर रँकसाठी वयोमर्यादा 23 ते 25 वर्षे इतकी आहे. सेवा कालावधी 3 ते 5 वर्षे आहे. तर दर महिना पगार ₹ दीड लाख ते 2 लाख इतका मिळतो.

सेकंड ऑफिसर रँकसाठी दर महिना पगार अडीच ते तीन लाख इतका मिळतो. 26 ते 28 वर्षे वय असावे लागते. याचा सेवा कालावधी 5 ते 7 वर्षे आहे.

फर्स्ट ऑफिसर होण्यासाठी वयाची मर्यादा 28 ते 30 वर्षे आहे. याचा सेवा कालावधी 7 ते 8 वर्षे आहे. यांना दर महिना 5 ते 7 लाख इतका पगार मिळतो.

10 वर्षाची सेवा झाल्यानंतर कॅप्टन ही सर्वोच्च रँक मिळते. 30 वर्षापुढील व्यक्ती कॅप्टन होते. यांना दर महिना 8 ते 12 लाख इतका पगार आहे.