12 May 2024 

रश्मिका आणि सलमान जोडी बॉलीवूडमध्ये करणार धमाका

Mahesh Pawar

पुष्पा : द राइज चित्रपटाद्वारे संपूर्ण भारतात लोकप्रियता मिळविणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे लवकरच सहा चित्रपट येत आहेत.

अॅनिमल चित्रपटाच्या यशाने ती स्टार अभिनेत्री बनली.

'पुष्पा 2'मध्ये रश्मिका ही श्रीवल्लीच्या भूमिकेत अल्लू अर्जुनसोबत खळबळ उडवून देणार आहे.

अभिनेता विकी कौशल याच्यासोबत रश्मिका मंदान्ना छावामध्ये दिसणार आहे.

साउथचे सुपरस्टार नागार्जुन आणि धनुष यांच्या 'कुबेर'मध्येही ती मुख्य भूमिका करत आहे.

तर, 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटामधील रश्मिकाचा लूक आधीच बाहेर आला आहे.

'रॅम्बो' सिनेमात रश्मिका ही टायगर श्रॉफ याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटासोबत रश्मिका आता बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्यासोबत 'सिकंदर'मध्ये मुख्य भूमिका करताना दिसणार आहे.