16 MAY 2024

या गावात 100 वर्षापासून कुणाचाही मृत्यू झाला नाही? इथे मरणे म्हणजे बेकायदेशीर आहे...

Mahesh Pawar

हे जग अनेक आश्चर्यकारक घटनांनी भरलेले ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याबद्दल कळल्यावर आपण म्हणतो, 'हे असंही असतं?

नॉर्वे देशात लाँगइयरब्येन हे असं एक शहर आहे की इथे माणसाच्या मृत्यूवर प्रशासनाने बंदी घातली आहे.

या शहरात 2,000 रहिवाशी आहेत. सरकारचा हा कायदा पाळणे सर्व रहिवाशांना बंधनकारक आहे.

1917 मध्ये इन्फ्लुएंजाने पीडित एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह लाँगइयरब्येनमध्ये दफन केला होता.

1998 मध्ये त्याचा त्याचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा मृतदेहामधे प्राणघातक विषाणूचे जिवंत नमुने आढळले होते.

याचे कारण म्हणजे नॉर्वेजियन द्वीपसमूहातील लाँगेयरब्यनमधील हवामान इतके थंड आहे की इथे मृतदेह कुजत नाहीत.

त्यामुळे इथे एखादी व्यक्ती आजारी पडली. तर त्याला विमानाने दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलं जाते.

मृतदेह कुजत नसल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने इथे कुणालाही मरण्यावर बंदी घातली.

नंतर त्याच ठिकाणी त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला जातो. अंत्यसंस्काराच्या कलशांना मात्र येथे दफन करण्याची परवानगी आहे.