30 March 2024
Mahesh Pawar
'रामायण' या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर अरुण गोविल हिंदूंच्या आराध्य रामाचा चेहरा बनले आहेत.
रामायणचे निर्माते, दिग्दर्शक रामानंद सागर यांनी अरुण गोविल यांना भूमिकेसाठी विचारले होते. पण, त्यांनी ती भूमिका नाकारली होती.
गोविल यांच्या मित्रांनी, कुटुंबीयांनी धार्मिक शोमध्ये काम केल्यास व्यावसायिक चित्रपटांमध्ये संधी कमी होईल, असा सल्ला दिला होता.
गोविल यांनी नकार दिल्यानंतरही रामानंद यांनी रामाची भूमिका साकारण्याची माझी मनापासून इच्छा आहे असे सांगितले.
राम ही भूमिका अरुण गोविल यांनी स्वीकारली. रामायण लोकप्रिय झाले आणि त्यामुळेच पुढे अनेक कामे मिळाली असे ते सांगतात.
1985 मध्ये त्यांनी सागरच्या प्रॉडक्शन विक्रम और बेतालमध्ये राजा विक्रमची भूमिका केली होती.
टीव्हीवर भगवान रामाची भूमिका करणारा अभिनेता म्हणून ओळख झाली. कुठेही गेलो तर लोक पाया पडत.
याचा परिणाम असा झाला की त्यांनी सिगारेट पिणे बंद केले. कारण, हातात सिगरेट घेतलेला राम कुणालाही आवडणार नाही.
गोविल यांनी अलीकडेच कलम ३७० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती.