27 May 2024

मी सलमान खानचा खलनायक, 'कटप्पा' देणार 'सिकंदर'ला टक्कर

Mahesh Pawar

सलमान खानच्या 'सिकंदर' या आगामी चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे

त्यातही या चित्रपटातील खलनायक कोण असणार याची उत्कंठा वाढली आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार सलमान खान स्टारर 'सिकंदर'चे बजेट जवळपास 400 कोटी इतके आहे. हा चित्रपट 1000 कोटीपर्यंत कमाई करू शकतो, अशी अपेक्षा आहे.

साउथचे दिग्गज अभिनेते सत्यराज हे 'सिकंदर' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

सत्यराज यांनी 'बाहुबली'मध्ये कट्टप्पाची भूमिका केली होती. त्यांनी 'मी सलमान खानचा खलनायक आहे' असे वक्तव्य केले आहे. 

सत्यराज यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या सिकंदरमधील एन्ट्रीवर काहींनी 'कटप्पा' देणार 'सिकंदर'ला टक्कर अशी प्रतिक्रिया दिली.

2022 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान सत्यराज यांनी चित्रपटात खलनायक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मला खलनायकाची योग्य भूमिका मिळाली तर मी पुन्हा खलनायक बनण्यास तयार आहे असे ते म्हणाले होते.

एका इंटरनेट युजरने "कट्टप्पाने अलेक्झांडरला का मारले हे देशाला जाणून घ्यायचे आहे." एक कमेंट केली आहे.