20 May 2024

शोलेच्या वीरूने 88 व्या वर्षी केले मतदान, या कारणावरून संतापले, म्हणाले तुमच्या आई-वडिलांवर...

Mahesh Pawar

शोलेमध्ये वीरूची भूमिका करणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला.

मुंबईतील जुहू भागात मतदानासाठी धर्मेंद्र पोहोचले. लाल चेक शर्ट आणि काळ्या टोपीमध्ये ते नेहमीप्रमाणेच मस्त दिसत होते. 

मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्यांनी फोटोग्राफर यांना मस्त पोझही दिली. मात्र, एका प्रश्नाने त्यांचा मूड बिघडला.

धर्मेंद्र यांना कॅमेऱ्यात कैद करत असताना एका फोटोग्राफरने त्यांना निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला. तो ऐकून त्यांचा संताप आला.

त्या प्रश्नावर धर्मेंद्र यांनी "चांगले नागरिक बना. देशभक्त व्हा. तुमच्या आई-वडिलांवर प्रेम करा. मला काय बोलायचे आहे ते तुम्हाला माहिती आहे." असे उत्तर दिले.

धर्मेंद्र यांचा हा संतप्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका इंटरनेट यूजरने यावर "तुम्ही धर्मेंद्रला का त्रास देत आहात? असा सवाल केला आहे.

एका युजरने "स्टुपिड कॅमेरा मॅन. किमान त्यांचे वय बघा आणि त्याला शांतपणे चालायला जागा द्या. अक्कल नाही." अशी प्रतिक्रिया दिलीय.

धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी इशा देओल यांनीही मतदानाचा हक्क बजावला.