11 June 2024

पायांवर दिसते हृदयरोगाचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडू शकेल महागात

Mahesh Pawar

हृदयरोगांमुळे जगभरात जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू होतो. याची कारणे वेगवेगळी असतात.

यातील एक महत्वाचं कारण म्हणजे शरीरात वाढलेलं एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल.

शरीरात याची लेव्हल वाढली तर शरीरावर सूज येते. यातील एक म्हणजे पायांवर सूज येणे.

पायांवर सूज येणं हा कंजेस्टिव हार्ट फेलिअरचा संकेत असू शकतो.

कंजेस्टिव हार्ट फेलिअर हा एक गंभीर आजार आहे. या आजारात हृदयाला ब्लड पंप करण्यात अनेक समस्या येतात.

ब्लड सर्कुलेशन योग्यपणे होत नसेल तेव्हा पायांमध्ये वॉटर रिटेशनची समस्या होते. ज्यामुळे पायांवर सूज बघायला मिळते.

पायांवर कुठेही सूज येण्याला पेरिफेरल एडिमा म्हटले जाते. हा लोकांमध्ये हार्ट फेल होण्याचा सुरूवातीचा संकेत असू शकतो.

त्यामुळे पायांवर विनाकारण अचानक सूज आली असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका असे केले तर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

यामुळे पायांमध्ये जडपणा होऊ शकतो. सोबत त्वचेवरही सूज दिसू शकते. काही निशाणही पडू शकतात. शूज घालण्यात समस्या होऊ शकते. 

अशावेळी पौष्टिक आहार घ्यावा. रोज व्यायाम करा. पायांवरील सूज कमी करण्यासाठी कमीत कमी मिठाचे सेवन करावे.

जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावे. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत.

हृदयासाठी लसूण चांगला असतो. लसणाची एक कळी, आल्याचा एक तुकडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस याचे मिश्रण जेवणाआधी घ्यावे.

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस पिल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात.