22 March 2024

अभिनेत्याचा संयम सुटला, जयाप्रदा यांनी सेटवरच लगावली थप्पड

Mahesh Pawar

70-80 च्या दशकातील अभिनेत्री जयाप्रदा केवळ सौंदर्यासाठीच ओळखली जात नाही. तर तिने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत.

सुपरस्टार जितेंद्र सोबत या अभिनेत्रीची जोडी सर्वाधिक आवडली होती. जयाप्रदा यांनी 'सरगम' चित्रपटातून पदार्पण केले होते.

पहिल्याच चित्रपटामधून ती रातोरात स्टार बनली. पण, याच चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीसोबत एक विचित्र घटना घडली होती.

जयाप्रदा चित्रपटात प्रसिद्ध खलनायक दिलीप ताहिलसोबत एक सीन शूट करत होत्या.

या दृश्यात दिलीप ताहिल इतके हरवून गेले की त्याचा संयम सुटला. त्याने जयाप्रदासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

दिलीपच्या या कृतीमुळे जयाप्रदा खूप अस्वस्थ झाल्या. त्या रागातच तिने सर्वांसमोर अभिनेत्याला जोरदार थप्पड लगावली.

जयाप्रदाच्या या कृतीमुळे सेटवरील वातावरण चांगलेच तापले. दिलीप ताहिल याला मारलेल्या या थप्पडची इंडस्ट्रीत अनेक दिवस चर्चा होती.

जयाप्रदा यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने ही थप्पड खऱ्या आयुष्यातली नसून रील लाईफमधील असल्याचे सांगितले.

जयाप्रदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसोबत राजकारणातही मोठी ताकद दाखवली. तेलुगु देसम पक्षातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

चंद्राबाबू नायडू यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्या रामपूरच्या खासदारही होत्या. आता त्या भाजपमध्ये आहेत.