10 March 2024
Mahesh Pawar
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे.
मंगळाच्या मीन राशी प्रवेशामुळे 3 राशींच्या व्यक्तींची संपत्तीत वाढ होईल. त्यांचे करिअर आणि व्यवसाय चमकू शकते.
मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीला फायदेशीर ठरू शकते. मंगळ या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.
नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकते.
वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल शुभ ठरू शकतात. हा राशी बदल कुंडलीतील उत्पन्न आणि लाभ स्थानात होणार आहे.
त्यामुळे उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
कुटुंबात शांती आणि आनंद राहील. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील.
मंगळाचे संक्रमण होताच कर्क राशीचे चांगले दिवस सुरू होतील. नशीब साथ देईल. कोणत्याही धार्मिक, शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल.
प्रलंबित कामे या कालावधीत पूर्ण होतील. संपत्ती वाढेल आणि भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल.