8 MAY 2024

वडिलांनी केली 4 लग्ने, आईपेक्षाही वयाने मोठी आहे 'ही' अभिनेत्री

Mahesh Pawar

बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांनी आपल्या आयुष्यात 4 लग्न केली आहेत.

कबीर बेदी यांचे पहिले लग्न 1969 मध्ये प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झाले. पण, 1974 साली त्यांचा घटस्फोट झाला.

प्रोतिमा आणि कबीर यांना एक मुलगी आहे. घटस्फोटानंतर त्यांनी फॅशन डिझायनर सुजान हम्प्रेज हिच्यासोबत दुसरं लग्न केले.

त्यानंतर त्यांनी 1992 साली रेडियो प्रेजेंटर निक रिड्स हिच्यासोबत तिसरे लग्न केले. काही वर्षानंतर त्यांनी तिसऱ्या पत्नीलाही घटस्फोट दिला.

वयाच्या 70 व्या वर्षी कबीर बेदी यांनी परवीन दुसांज हिच्यासोबत चौथा संसार मांडला.

त्याच्या नव्या वधूचे वय 48 वर्ष होते. तर, त्याच्या मुलीचे वय त्यावेळी 53 वर्ष होते.

ही मुलगी म्हणजे कबीर बेदी आणि यांची प्रोतिमा बेदी यांची मोठी मुलगी पूजा बेदी.

पूजा हिने 'विषकन्या' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 

आमिर खान याच्या 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटामधून ती प्रसिद्धीझोतात आली होती.

1994 मध्ये पूजाने फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले.पण, 2003 मध्ये पूजाने फरहानला घटस्फोट दिला.

पूजाला फरहानपासून उमर आणि आलिया अशी दोन मुले आहेत.