13 March 2024

या स्टार्सचे वडील आहेत करोडपती, काही आमदार तर काहीचे आहेत कॉफीचे मळे

Mahesh Pawar

बॉलीवूडचे जग ग्लिट्जचे जग मानले जाते. लोक संपत्ती आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवण्याच्या इच्छेने येथे येतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांची पार्श्वभूमी फार कमी लोकांना माहिती आहे.

रणवीर सिंग याचे वडील जगजीत सिंग भवनानी ऑटोमोबाईल रिटेल, लेदर आणि मेडिकलच्या व्यवसायात गुंतलेले आहेत.

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिचे वडील मदन मंदान्ना यांचे कर्नाटक (कूर्ग) येथे कॉफीचे मळे आहेत. हे मोठे उद्योगपती आहेत.

कियारा अडवाणी हिचे वडील जगदीप अडवाणी व्यवसायाने व्यापारी आहेत. ते रिलायन्स ग्रुपच्याही जवळचे आहेत.

अलायाचे वडील फरहान इब्राहिम फर्निचरवाला हे मुंबईत फर्निचरच्या मोठ्या व्यवसायाचे मालक आहेत. ते इंटिरियर डिझायनर देखील आहेत. 

आदिती राव हैदरी या राजघराण्यातील आहेत. त्यांचे वडील एहसान हैदरी हे देखील राजघराण्यातील होते.

भूमी पेडणेकर हीला राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे वडील सतीश हे आमदार आहेत. ते महाराष्ट्राचे माजी गृह आणि कामगार मंत्री होते.

राधिका मदनचे हिचे वडील नटराज स्टेशनरी प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्ड सदस्यांपैकी एक आहेत. गुडगावमध्येही त्यांचा मोठा बंगला आहे.

शर्वरी वाघ या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. तिचे वडील शैलेश वाघ हे डवेल वेल बिल्डर्सचे मालक आहेत.

यामी गौतम हिचे वडिल मुकेश गौतम पीटीसी पंजाबी नेटवर्कचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांनी काही पंजाबी चित्रपट देखील केले आहेत.

चंद्रचूड सिंह हे देखील राजघराण्याशी संबंधित आहेत. त्याची आई ओडिशाच्या बोलंगीरच्या महाराजांची मुलगी आहे.