12 March 2024

स्वराज्याचे पहिले असे एकमेव सरसेनापती; ज्यांना पितापुत्राचा सहवास लाभला

Mahesh Pawar

स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते ज्यांनी शहाजीराजेंसाठी 15 तर शिवाजीराजेंसाठी 20 अशी सलग 35 वर्षे स्वराज्याची सेवा केली.

1642 ते 1651 अशी सलग 17 वर्षे ते सरसेनापती होते. दीर्घ काळ सरसेनापती असणारे ते एकमेव होते.

बाकीचे वर्षे त्यांनी प्रमुख सल्लागार आणि युद्धशास्त्र तज्ञ म्हणून स्वराज्यासाठी काम केले.

शहाजीराजे आणि शिवाजीराजे या दोन्ही राजांची मर्जी असल्यामुळे त्यांनी कधीच संपत्तीचा मोह किंवा चिंता केली नाही.

सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा कुळात जन्मलेल्या माणकोजी दहातोंडे हे ते सरसेनापती. अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील चांदा हे त्यांचे मुळगाव.

शहाजीराजेंसोबत त्यांनी निजामशाहीत काम केले. नंतर शहाजीराजे, माणकोजी विजापुरच्या सेवेत दाखल झाले होते.

विजापुरातच शहाजी यांनी स्वराज्याचा संकल्प सांगत स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून नियुक्ती केली होती.

शिवाजी महाराज यांचे सरसेनापती, मार्गदर्शक होते. त्यांचा अनुभव आणि युद्धनितीमुळे महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या.

गनिमी कावातज्ञ म्हणून माणकोजी दहातोंडे यांची ओळख स्वराज्यात होती. 1662 मध्ये शिवापुर येथे माणकोजी दहातोंडे यांचे निधन झाले.