23 March 2024
Mahesh Pawar
इतिहासात डोकावलं तर त्या काळी स्त्रिया चुल आणि मुल यात अधिक रमणाऱ्या असल्या तरी वीरांगनांचाही इतिहास मोठा आहे.
याच यादीत एक महत्वाचं नाव म्हणजे घोरपडे गादी सांभाळणाऱ्या आणि वेळप्रसंगी वाड्याबाहेर पडून मोहिमा लढणाऱ्या अनुबाई घोरपडे
अनुबाई घोरपडे याचं पेशव्यांसोबत एक खास नातं होतं. थोरले बाजीराव, नानासाहेब, विश्वासराव यांच्याइतकीच ती पराक्रमी
अनेक आघाड्यांवर लढणारी एक व्यक्ती म्हणजे थोरले बाजीराव यांची धाकटी आणि लाडकी बहीण म्हणजे अनुबाई घोरपडे.
अनुबाई सहा वर्षांच्या असताना त्यांचा विवाह इचलकरंजीचे व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला.
लग्नानंतर सुरवातीला त्या संसारात रमल्या. मात्र, दरबारातील राजकारण, समाजकारण यातही त्यांची रुची होती.
व्यंकटराव मोहिमांवर असताना अनुबाईंना इचलकरंजीला करमत नसे. त्या पेशव्यांकडे पुण्याला येत असत.
व्यंकटराव घोरपडे यांचे क्षयरोगाने निधन झालं. वैधव्यामुळे त्या खचल्या पण इचलकरंजीच्या राजकारभाराकडे पहात त्यांनी आपले अश्रु गिळले.
1745 साली मुलगा नारायणराव यांना गादीवर बसवत त्यांनी कारभार आपल्या हाती घेतला.
1756 साली सावनूर आणि धारवाडच्या मोहिमेत अनुबाई स्वतः रणी उतरल्या. ही मोहिम फत्ते झाल्यानंतरच त्या इचलकरंजी येथे पतरल्या.
या मोहिमेत त्यांनी बेळगाव, बागलकोट, मिश्रीकोट, धारवाड यांसारखी अनेक महत्वाची ठाणी आपल्याकडे घेतली.
1775 च्या श्रीरंगपट्टमणच्या मोहिमेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इचलकरंजीच्या सैन्याने पराक्रम गाजवला.
पराक्रमी अनुबाईं यांचे शौर्य पाहून नानासाहेब पेशव्यांनी धारवाडचा संपूर्ण परिसर त्यांच्या ताब्यात दिला होता.
मुलाच्या निधनानंतर त्यांनी नातवाला गादीवर बसवलं आणि प्रत्यक्ष सत्तेची दोरही त्यांनी आपल्याच हाती ठेवला.
1745 पासून तब्बल 38 वर्ष त्या इचलकंजीची राज्यकर्ती म्हणून काम पहात होत्या. पण, घरातील कारवायांना कंटाळून त्यांनी राजसंन्यास घेतला
1783 साली त्यांचे तुळापुर येथे निधन झालं.