7 MAY 2024

भारतातील सर्वात महागडा आंबा, 500 वर्षांचा इतिहास, संपूर्ण देशात आहेत फक्त 3 झाडे

Mahesh Pawar

उन्हाळा येताच आंब्याचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे आंब्याच्या अनेक जाती बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे.

देशात आणि जगात आंब्याच्या अनेक जाती आहेत. काही आंबे 100 रुपये किलो तर काही 200 रुपये किलोने विकत आहेत.

भारतात सर्वात प्रसिद्ध असे अल्फोन्सो, हापूस आहेत. याशिवाय बदाम, दसरी, तोतापरी, लंगडा यासह आंब्याचे अनेक प्रकार आहेत.

पण, भारतातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल माहिती आहे का? सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या जातीच्या आंब्याची देशात फक्त 3 झाडे आहेत.

या जातीच्या आंब्याची किंमत ऐकली तर तुम्हाला धक्का बसेल. या एका आंब्याची किंमत प्रति किलो आंब्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

भारतातील हा सर्वात महागडा आंबा देशाच्या मध्यभागी म्हणजेच मध्य प्रदेशात पिकवला जातो. हा आंबा किलोच्या भावाने विकला जात नाही.

या जातीच्या एका आंब्याची किंमत 1,200 रुपये आहे. मध्यप्रदेशातील अलीराजपूरमध्ये हा खास आंबा पिकवला जातो.

1577 ते 1645 या काळात हा आंबा भारतात आणला गेला तेव्हा या आंब्याचे नाव मल्लिका नूरजहाँ ठेवण्यात आले.

भारतातील या आंब्याच्या प्रजातीचा इतिहास सुमारे 500 वर्षांचा आहे. त्याची झाडे अफगाणिस्तानातून आणली होती.

अलीराजपूरमध्ये पिकणारा हा आंबा आहे नूरजहाँ. हा आंबा केवळ मध्य प्रदेशचाच नाही तर देशातील एक अनोखा आंबा आहे.

नूरजहाँ आंबा संपूर्ण देशात अलीराजपूर वगळता कुठेही मिळत नाही. वर्षभरात या झाडापासून केवळ 100 आंबे तयार होतात.

संपूर्ण देशात फक्त तीन नूरजहाँ जातीची आंब्याची झाडे उरली आहेत. मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतून हा आंबा खरेदी करण्याची मागणी होत आहे.