14 MAY 2024

चंद्रावर दफन करण्यात आलेला एकमेव शास्त्रज्ञ, नासाने केली अखेरची इच्छा पुर्ण

Mahesh Pawar

आतापर्यंत चंद्रावर जाऊन तेथे संशोधन करून परत आल्याचे अनेकांना माहितच आहे.

पण, याच चंद्रावर एका व्यक्तीला दफन केलेले आहे. हे मात्र अनेक लोकांना माहित नाही.

एका अमेरिकन शास्त्रज्ञाची अखेरची इच्छा होती की, मला चंद्रावर दफन करण्यात यावे.

ते मरण पावल्यानंतर नासाने त्यांची अखेरची इच्छा पुर्ण केली. युजिन शुमेकर असे या अमेरिकन शास्त्रज्ञाचे नाव आहे.

शुमेकर यांनी खगोलशास्त्रावर खुप अभ्यास केला होता. खुप प्रयोग केले होते.

1960 मध्ये अमेरिकन भुगोलशास्त्रीय सर्व्हेमध्ये खगोलशास्त्रीय संशोधन प्रोग्राम केले आहेत.

शुमेकर यांना खरेतर अंतराळवीर व्हायचे होते, पण काही वैद्यकीय कारणांमुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

जुलै 1997 मध्ये ते ऑस्ट्रेलियात उल्कांचा शोध घेत असतानाच एका कार अपघातात त्यांचा मृत्यु झाला.

शुमेकर यांचे सहकारी कॅरोलीन पॉर्को यांनी नासाला त्यांची ही शेवटची इच्छा सांगितली.

नासाने सेलेस्टीस कंपनीला फोन करून याबाबत मदत करण्यास सांगितले.

शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर पाठवण्यासाठी पॉली कार्बोनेट कॅप्सुल तयार केली. त्यामध्ये शुमेकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या.

1998 मध्ये चंद्रावर गेलेल्या ल्युनार प्रॉस्पेक्टर स्पेसक्रॉफ्ट या यानामधुन शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर नेण्यात आल्या.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांच्या अस्थी असलेली पॉली कार्बोनेट कॅप्सुल दफन करण्यात आली.

चंद्रावर दफन करण्यात आलेले ते पृथ्वीवरील एकमेव मानव आहेत.