11 March 2024
Mahesh Pawar
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल राखणे हे एक मोठे आव्हान असू शकते.
महिलांकडे कार्यालयाची तसेच घराची अशा दोन्ही जबाबदाऱ्यांचे फार मोठे ओझे असते. यामुळे त्यांच्यात चिडचिड, राग आणि तणाव वाढतो.
या कारणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
यातून बाहेर पडण्यासाठी करिअर किंवा कुटुंब यापैकी एक निवडणे हाच पर्याय उरतो. काही टिप्स फॉलो केल्या तर योग्य संतुलन राखता येते.
ऑफिसमध्ये तुमच्यावर कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी यासाठी तुमच्या सुट्टीचा त्याग करू नका.
सुट्टीच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले. यामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते.
ऑफिसचे काम कधीही घरी आणू नका किंवा ऑफिसमध्ये घरातील काम संपवण्याचा प्रयत्न करू नका.
घरातील कामापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सर्व काही वेळेत पूर्ण करण्यासाठी योजना तयार करा आणि त्याचे पालन करा.
मन ताजेतवाने करण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांशी बोला.
एखादी गोष्ट तुम्हाला खूप त्रास देत असेल तर ती तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करण्यात काही गैर नाही.
एखादी गोष्ट तुम्हाला खूप त्रास देत असेल तर ती तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करण्यात काही गैर नाही.