8 MAY 2024

बॉलीवूडची ही सुंदरी कधीच शाळेत गेली नाही, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Mahesh Pawar

तिचा जन्म 16 जुलै 1983 रोजी ब्रिटिश हाँगकाँगमध्ये झाला. तिचे वडील ब्रिटिश व्यापारी आहेत.

आई टर्कोटे ही एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. तिचे पालक लहान वयात वेगळे झाले.

त्यामुळे आईने तिला आणि तिच्या सर्व बहिणींना एकट्याने वाढवले.

तिची आई सामाजिक कार्यकर्ती असल्याने त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहायच्या.

म्हणून तिला आणि तिच्या भावंडांना घरी शिकवणाऱ्या शिक्षकांनीच शिकवले. पण, त्या कोणत्याही शाळेत गेल्या नव्हत्या.

अगदी लहान वयातच मॉडेलिंग करायला सुरुवात केली आणि आता ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आहे.

कतरिना कैफ हिचा पहिला चित्रपट 'बूम' फ्लॉप ठरला होता. पण, नंतर तिने मल्लिसवारी या तमिळ चित्रपटात काम केले. तो हिट झाला.