31 March 2024

जया, रेखा नव्हे तर अमिताभ यांच्यामुळे दोन सुपरस्टार अभिनेत्री झाल्या एकमेकींच्या शत्रू

Mahesh Pawar

अमिताभ बच्चन  यांनी करिअरच्या सुरुवातीपासूनच जबरदस्त भूमिका साकारल्या. सशक्त भूमिकामुळे ते सर्वांचे आवडते अभिनेते झाले.

आज वयाच्या 81 व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांचे स्टारडम कमी झालेले नाही. आजही निर्मात्यांच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

आजही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. हा ट्रेंड वर्षानुवर्षे सुरू आहे.

एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यावरून दोन सुपरस्टार अभिनेत्री एकमेकांच्या शत्रू बनल्या.

प्रसिद्ध दिग्दर्शक टिनू आनंद यांच्या 'शहेनशाह' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.

शहेनशाहमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री झळकली होती. 

या चित्रपटानंतर टिनू आनंद हे 'शिनाख्त' चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. यात लीड अभिनेत्री माधुरी दीक्षित होती.

दुसऱ्या लीड अभिनेत्रीसाठी मीनाक्षी शेषाद्रीला विचारण्यात आले. पण मीनाक्षीने सेकंड लीड बनण्यास नकार दिला.

या दोन्ही अभिनेत्रींमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यावरून बरीच चर्चा झाली. पण, मीनाक्षीला सेकंड लीड व्हायचे नव्हते.

मीनाक्षीने चित्रपट सोडला. त्यामुळे माधुरी आणि तिच्यात अंतर निर्माण झाले. मीनाक्षी हिच्यामुळे हा चित्रपट रखडला.

मीनाक्षी आणि माधुरी दोघीनाही अमिताभ यांच्यासोबत काम करायचे होते. मात्र, मीनाक्षीला सेकंड लीड नको होता.