13 May 2024 

शॉर्टगन शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल असं काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा?

Mahesh Pawar

सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या हिरामंडी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

हिरामंडीमध्ये तिने 'फरदीन' नावाची नकारात्मक भूमिका साकारली आहे.

सोनाक्षी सिन्हा हिने या चित्रपटाबाबत नकारात्मक भूमिकेबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

जेव्हा मला फरदीनची भूमिका ऑफर करण्यात आली तेव्हा मी खूप उत्साहित होते असे तिने सांगितले.

माझ्या वडिलांनी सुरुवातीला खलनायकाची भूमिका केली होती. त्यामुळे मलाही तशीच भूमिका करायची होती.

सोनाक्षी म्हणते, 'मी लहानपणी चित्रपट पाहत नव्हते. पण, मला खेळायला खूप आवडायचं. अभिनयात मला काही रस नव्हता.'

सुरुवातीच्या काळात मी माझ्या वडिलांचे फक्त 4 चित्रपट पाहिले होते. वडिलांनी जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यांना मी आता पाहतोय असे ती सांगते.