7 June 2024
Mahesh Pawar
सलमान खान याच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटासाठी एक लहान मुलीचा शोध सुरु होता.
5000 मुली स्क्रीन टेस्टसाठी आल्या होत्या. त्यामधून बजरंगी भाईजानच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली.
'बजरंगी भाईजान'मध्ये त्या मुलीने पाकिस्तानातून आलेली मुन्नीची भूमिका केली होती जी बोलू शकत नव्हती.
मुन्नी हिची भूमिका हर्षाली मल्होत्रा हिने केली होती. तीच सलमानची 'मुन्नी' आता 16 वर्षांची झाली आहे.
हर्षाली 21 महिन्यांची असताना तिने टीव्हीवर पहिली जाहिरात केली होती.
हर्षाली मल्होत्रा हिने तरुण वयातच कॅमेरा फेस करायला सुरुवात केली होती.
स्क्रीन टेस्ट दरम्यान पहिल्याच भेटीत हर्षाली हिने सलमानला एका प्रश्न विचारला होता.
हर्षालीने सलमानला 'तू मला सुपरस्टार बनवशील का? असा प्रश्न विचारला होता.
इतक्या लहान वयात तिच्या या प्रश्नाने भाईजान सलमानही थक्क झाला होता.
हर्षाली मल्होत्राने तरुण वयातच कॅमेरा फेस करायला सुरुवात केली होती.
हर्षाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर 34 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.