गॅस, ॲसिडिटी, अपचन, छातीत जळजळ हा त्रास अनेकांना होतो.

13 June 2025

ॲसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्याचे दोन उपाय जाणून घेऊ या. यामुळे दोन मिनिटांत ॲसिडिटीचा त्रास नष्ट होईल.

ॲसिडिटी दूर करण्यासाठी बेकींग सोडा, लिंबू आणि पाणी घ्या. अर्धा ग्लास साध्या पाण्यात अर्धा चमचा बेकींग सोडा आणि लिंबू मिक्स करुन त्याचे सेवन करा. 

ॲसिडिटीपासून आराम या उपायाने मिळेल. बेकींग सोडा तुमच्या पोटातील ॲसिडला न्यूट्रीलाइज करतो.

बेकींग सोडाचा वापर वारंवार करु नका. दिवसातून एक-किंवा दोन वेळाच त्याचा वापर करा.

ॲसिडिटीपासून दीर्घ काळापर्यंत आराम हवा असेल तर एक कप हर्बल चहा घ्या. 

हर्बल चहा बनवण्यासाठी जिरे, धने, बडीशेपचा वापर करा. 

हर्बल चहा बनवण्यासाठी दोन कप पाण्यात एक चमचा जिरे, बडीशेप आणि धने टाकून उकळून घ्या.

पाणी दीड कप झाल्यावर कोमट होऊ द्या. त्यानंतर त्याचे सेवन केल्यावर ॲसिडिटी कमी होईल आणि पचनसुद्धा चांगले होईल.