मनुष्याने पाप केल्यानंतर त्यातून पाप मुक्तीसाठी तो गंगा स्नान करतो. पण ती पापं पुन्हा फिरुन त्याच्याकडेच परत येतात. त्यानंतर त्याची या पापांमधून कशी मुक्ती होते?

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

या संबंधी एक पौराणिक कथा आहे. एकदा काही ऋषी-मुनी गंगेजवळ गेले. गंगेला विचारलं, मनुष्य इथे स्नान करुन त्याची पापं तुमच्या पाण्यात विसर्जित करतो. 

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

ऋषी-मुनी म्हणाले की, याचा अर्थ असा होतो की, तुम्ही त्या पापात भागीदार झालात. गंगेने ऋषी-मुनींना सांगितलं, ती ही सर्व पापं समुद्राला अर्पण करते.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मग, ऋषी-मुनी समुद्राजवळ गेले. त्यालाही तोच प्रश्न विचारला. समुद्राने सांगितलं, तो मनुष्याची सर्व पापं वाफ बनवून ढगांना अर्पित करतो.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आता ऋषी-मुनी ढगांजवळ गेले त्यालाही तोच प्रश्न विचारला. ढगाने सांगितलं तो पापी नाहीय. वाफ रुपी पाप पाणी बनवून पावसाच्या माध्यमातून पुन्हा पृथ्वीवर पाठवतो.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

याच पाण्याने शेतकरी त्याच्या शेतात अन्न निर्मिती करतो. ते अन्न तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशाने विकत घेता. अस करुन तुम्ही पापात भागीदार होण्यापासून स्वत:ला वाचवता.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

बेईमानाने कमावलेल्या पैशाने तुम्ही ते अन्न विकत घेतलं, तर पुन्हा तुम्ही पापाचे भागीदार होता. म्हणून माणसाने नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. 

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab