हाय ब्लड शुगरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

Created By: Atul Kamble

 2 April 2026

खराब जीवनशैली आणि चुकीचा आहारामुळे बहुतांशी लोकांना डायबिटीजची समस्या होत शकते.हा आजार पूर्णपणे बरा होत नाही.यास औषध आणि योग्य आहाराने नियंत्रणात आणता येते.

 डायबिटीजमध्ये ब्लड शुगरचे नियंत्रण असणे गरजेचे असते. शुगर जास्त झाली तर त्याचे अवयवांवर परिणाम होतात. डायबिटीज दोन प्रकारचे असतात. दोन्ही खतरनाक असतात.

आज आपण हायब्लड शुगरशी संबंधित काही संकेत जाणूयात. या संकेतांना जराही दुर्लक्ष करु नये. 

जर तुमची जखमी लवकर भरत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटायला हवे.

जर तुमच्या हातापायांना वारंवार झिणझिण्या येत असेल, तर या लक्षणांना दुर्लक्ष करु नये.रक्तात शुगरची पातळी वाढल्याचे हे लक्षण आहे.

काम केल्यानंतर थकणे नॉर्मल आहे. परंतू आराम करुनही तुमचा थकवा कमी होत नसेल, तर याचा अर्थ तुमची हाय ब्लड शुगर वाढलेली असू शकते.

पाणी पिल्यानंतरही तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर हे तुमची ब्लड शुगर वाढल्याचे लक्ष असू शकते.

 तुम्हाला दीर्घकाळ हेल्दी राहण्यासाठी ब्लड शुगर संबंधित या लक्षणांना दुर्लक्ष करुन चालणार नाही. या शिवाय तुमच्या आहारात तुम्ही हेल्दी फूड्सचा समावेश करायला हवा. 

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )