या 6 एक्सरसाईज करा आणि जिमला बाय... बाय करा

20 June 2025

Created By: Atul Kamble

फिट राहण्यासाठी जिमला जायची काही गरज नाही. घरबसल्या काही सोप्या स्टेप करा आणि फिट राहा

 या स्टेप केवळ बॉडी टोन करणार नाहीत तर तुमचा स्टेमिना आणि स्ट्रेन्थ वाढवतील

स्वॅट्स पाय, मांड्या आणि पोटाच्या स्नायूंना मजबूत बनवते.तुमच्या घुडघ्यांना असे वाकवा जसे खुर्चीवर बसताना वाकतो तसे. याने संतुलन चांगले होते.ताकद वाढते

 पुशअप्स - या एक्सरसाईजने छाती,खांदे आणि दंड मजबूत होतात.सुरुवातील गुडघ्याआधारे करा,हळूहळू ताकद वाढेल शरीर टोन होईल.

प्लँक - याने पोटाचे स्नायू मजबूत होतात.शरीराला सरळ करून कोपर आणि पंजाच्या सहाय्याने शरीराचे वजन पेलायचे

लंजेस- याने मांड्या आणि हिप्स टोन होतात. एक पाऊल पुढे न्या, हळूहळू खाली वाका जोपर्यंत दोन्ही गुडघे ९० डिग्रीवर येत नाहीत. नंतर पाय बदलत राहा

जर तुम्हाला कोर्डिओ करायचा आहे तर हाय नीज सर्वात सोपे आहे.एकाजागी उभे राहून गुडघ्यांना वेगाने छातीकडे ओढावे,याने हृदयाचे आरोग्य वाढते

पाठ टेकून जमीनीवर झोपा.गुडघे दुमडा आणि पाय जमीनीवर ठेवा,आता तुमच्या नितंबांना वर उचला म्हणजे खांद्यापासून गुडघ्या पर्यंत सरळ रेषा बनते.