उपवासाच्या वेळी आपण पाकिस्तानातून आणलेले मीठ खातो का?

27 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

प्रत्यक्षात भारतात सैंधव मीठ तयार होत नाही. यासाठीच आपल्याला पाकिस्तानवर अवलंबून राहावे लागते

पाकिस्तानमध्ये हे मीठ फक्त 2 ते 3 रुपये प्रति किलोने विकलं जातं. तर भारतात त्याची किंमत 50 ते 60 रुपये प्रति किलो

पाकिस्तानची खेवडा मिठाची खाण ही जगातील सर्वात मोठी खाण मानली जाते. ही खाण सुमारे 2000 वर्षे जुनी आहे

येथे उत्पादित होणारे मीठ उच्च दर्जाचे मानले जाते. या खाणीतून दरवर्षी सुमारे 4.5 लाख टन रॉक मीठ काढले जाते.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हे  मीठ सैंधव आढळतं.

हे देशातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने रॉक सॉल्ट मानले जाते. हा परिसर पाकिस्तानातील इस्लामाबादपासून सुमारे160  किलोमीटर अंतरावर आहे.

हे मीठ भारतातील प्रत्येक घरात विशेषतः सण आणि उपवासाच्या वेळी वापरले जाते