Chanakya Niti : जीवनात वारंवार अपयश पदरी पडते? कुत्र्यांच्या या सवयींमधून घ्या प्रेरणा

15 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

प्राणी आणि पक्ष्यांच्या काही सवयींमधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळते. कुत्र्यांच्या काही सवयी अंगीकारून आपण जीवनात यश मिळवू शकतो. 

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. चाणक्य यांच्या मते, कठीण काळात कुत्र्‍याकडून काही गोष्टी शिकता येतात. 

चाणक्य नीतिनुसार, कुत्र्यामध्ये असलेली समाधानाची भावना माणसात असली पाहीजे. कारण अधिकचा लोभ मनात अशांतता निर्माण करते. 

चाणक्य नीतिनुसार, माणसाला कुत्र्यासारखी झोप असावी. थोडासा आवाज आला तर सावध व्हावं. यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. 

कुत्रा हा निष्ठावान प्राणी आहे. चाणक्य नीतिनुसार, हा गुण माणसाने शिकला पाहीजे. यामुळे कामात लवकर यश मिळते. 

कुत्रा हा निर्भय प्राणी आहे. त्याच्या मालकासाठी प्रत्येक अडचणींचा सामना करतो. ही सवय अंगीकारली तर मनुष्य कोणतेही काम निर्भयपमे करू शकतो. 

स्वप्नात स्वत:ला वरून खाली पडताना पाहीलं तर काय? जाणून घ्या