सकाळी उठल्यानंतर छातीत जडपणा वाटतो? हृदयरोगाचं लक्षण आहे का?

1 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला छातीत दाब किंवा जडपणा तेव्हा तुम्हाला ती सामन्य समस्या वाटू शकते. पण त्यामागे काही कारणं असू शकतात. 

रात्री उशिरा जेवणे, जड अन्न किंवा जास्त तेल आणि मसाले असलेले पदार्थ खाल्याने पचनक्रियेत समस्या होऊ शकते. पोटात गॅस तयार होतो आणि छातीत जडपणा वाटतो. 

मानसिक ताण, चिंता आणि झोपेचा अभाव असल्याने शरीर जड वाटू लागते. अशा परिस्थितीत सकाळी उठताना छातीत जडपणा वाटणे हे मानसिक लक्षण असू शकते. 

मॅक्स हॉस्पिटलमधील डॉ. रोहित कपूर यांच्या मते छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे, मळमळ किंवा हातापायांना मुंग्या हे हृदयविकाराचं लक्षण असू शकते. 

चुकीच्या पद्धतीने झोपल्याने म्हणजेच डोकं खूप उंच करून झोपल्याने फुफ्फुसांवर आणि छातीच्या स्नायुंवर दाब येतो. यामुळे सकाळी जडपणा वाटू शकतो. 

दमा किंवा एलर्जी असल्यास छातीत जडपणा वाटतो. खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर जडपणा येऊ शकतो. 

छातीत जडपणा येऊ नये यासाठी हलकं आणि वेळेवर जेवा. दररोज 8 तास झोपा, ताण टाळा आणि श्वसनाचे प्रकार करा. तरीही तसंच वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

उन्हात राहिल्यानंतरही व्हिटॅमिन डी वाढत नाही का? असं का ते समजून घ्या