सकाळी नाश्तामध्ये अनेक जण ब्रेड खातात. ब्रेड खाल्यामुळे पोटही भरल्यासारखे वाटते. 

6 June 2025

ब्रेडमध्ये रिफाईन्ड कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी वाढवते.

जास्त प्रमाणात साखर आणि कॅलरी खाल्ल्याने लिव्हरमध्ये (यकृत) चरबी जमा होते. ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. 

डायटिशियन परमजीत कौर म्हणतात, पांढरा ब्रेड जास्त खाल्यामुळे लिव्हर फॅटी होण्याचा धोका वाढतो. कारण त्यात असलेले रिफाइंड कार्ब्स आणि साखर फॅटमध्ये बदलते.

पांढरा ब्रेड नुकसानदायक असतो. त्यात फायबर जवळपास नसतात. त्यापेक्षा ब्राउन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड अधिक चांगले आहे. परंतु त्याचा वापरही प्रमाणात केला पाहिजे.

ब्रेडमुळे वजन आणि ब्लड शुगर लेव्हल वाढते. त्यात पोषण कमी असल्यामुळे शरीरास पुरेशी एनर्जी मिळत नाही. 

ब्रेड ऐवजी ओट्स, पोळी, भाकरी, फ्रूट्स किंवा अंडे यांचा समावेश डाइटमध्ये करावा. 

यकृत हेल्दी बनवण्यासाठी खूप पाणी घ्या. तळलेले पदार्थ खाणे टाळा. मद्यपान आणि धुम्रपान करु नका. नियमित व्यायाम करा.