थंडीत तुळशीच्या पानांसोबत हा पदार्थ खाल्ल्याने सर्दी-पडसे होईल गायब

28 November 2025

Created By: Atul Kamble

तुळशीच्या पानात एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी ऑक्सिडेंट्स , एंटीबॅक्टेरियल, एंटीव्हायरल गुणासह अनेक पोषक तत्वे असतात.

 तुळशीच्या पानाने अनेक आजार बरे होतात. आयुर्वेदात तुळशीचा औषधी वनस्पती म्हटले आहे.

तुळस उष्ण असते. त्यामुळे थंडीत मर्यादित प्रमाणात तिचे सेवन करणे फायदेशीर असते

तुळशीच्या पानांसोबत काळीमिरी खाल्ली तर अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो

 या दोन्हीचे एकत्र सेवन केले तर सर्दी-पडसे, कफ आणि रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित समस्येत आराम मिळतो.

काळी मिरी आणि तुळशीचे सेवन केल्याने इम्युनिटी बूस्ट होते. पोट साफ होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो. याचा काढा किंवा चहा बनवून पिणे चांगले असते.

दोन्ही उष्ण असल्याने मर्यादित प्रमाणात त्यांचे सेवन करावे. बीपी, शुगर वा अन्य समस्या असतील तज्ज्ञांच्या सल्ल्याने सेवन करावे.