थंडीत दूधासोबत हा पदार्थ खाणे खूपच फायदेशीर, पाहा कोणता?

22 November 2025

Created By: Atul Kamble

दूधाचा गुणधर्म उष्ण असतो. थंडीत रात्रीच्या वेळी दूध पिणे चांगले असते. शरीराला गरम राखण्यासह दूधाचे अनेक फायदे मिळतात. 

दूधासह अनेक पदार्थांचे सेवन करु शकता. थंडीत तुम्ही दूधासोबत खजूर खाऊ शकता. जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

जयपूरच्या डायटिशियन मेधावी गौतम यांच्या मते खजूर खाल्ल्याने एनर्जी मिळते. थंडीत खजूर खाल्ल्याने सर्दी- खोकल्यापासून आराम मिळतो.शरीर गरम रहाते. 

 गरम दूधात खजूर उकळून सेवन केल्याने थंडीत आरोग्यासाठी खूपच फायदा मिळतो. परंतू खजूर मर्यादित प्रमाणात खावे.

 थंडीच्या एका दिवसात २ ते ३ खजूर खाणे पुरेसे असते. जास्त खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. यात नेचरल शुगर असते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी खाऊ नये.

खजुरात आयर्न चांगल्या प्रमाणात असते. हे नैसर्गिकरित्या गोड असल्याने त्यात काही मिक्स करण्याची काही गरज नाही. थेट खाऊ शकता. 

जर पुरेशी झोप घेऊन डोळ्याखाली काळी वर्तुळे येत असतील तर आयर्नची कमतरता असू शकते. तुम्ही पालक,खजूर, राजमा सारखे पदार्थाने शरीरातील आयर्नची कमी पूर्ण करु शकता.