21 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
अंडी हे पोषक तत्वांनी भरलेली असतात. एका अंड्यात प्रथिने, फॅट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी असते. तसेच कोलीन, ल्युतीन आणि झेक्सॅन्थिन असते.
अंड्यातील फॅट पिवळ्या बलकात असते. त्यामुळे अनेक लोकं पांढरा भाग खातात. कारण या भागात फॅट नसते.
अंड्यातील पिवळ्या बलकामुळे कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढते म्हणून अनेक जण ते खाणं टाळतात. चला जाणून घेऊयात नेमकं काय ते.
अंड्याच्या दोन्ही भागात पोषक तत्व असतात. ज्यांना कॅलरीज वाढण्याची भिती असते त्यांनी पांढरा भाग खावा. यामुळे कॅलरीज वाढत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
अंड्यातील पिवळ्या भागात अ, ड, ई, के, बी, फॉस्फरस, लोह आणि जस्त यासाखे घटक असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पिवळ्या बलकात हृदयासाठी निरोगी फॅट आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते. पण दिवसातून फक्त एक अंड्याचा पिवळा भाग खाऊ शकता.
अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने मेंदू तीव्र होतो, हाडे मजबूत होतात. यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडत नाहीत.