फ्रिजमध्ये अंडी ठेवताना करू नका या चुका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

3 July 2025

Created By: Swati Vemul

रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रिजमध्ये अंडी ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे

तज्ज्ञांच्या मते, अंडी ताजी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ती फ्रिजमध्ये सुमारे चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवावीत

फ्रिजचा दरवाजा वारंवार बंद-उघड केल्याने आतील तापमानात चढउतार होते

जर अंडी फ्रिजच्या दारातील खणात ठेवली तर त्यांचं तापमान सतत बदलतं

यामुळे साल्मोनेला सारख्या बॅक्टेरियाचा धोका वाढतो आणि अंडी लवकर खराब होऊ शकतात

त्यामुळे अंडी फ्रिजच्या दाराच्या खणात न ठेवता ती आत ठेवावीत

अनेकजण अंडी धुवून फ्रिजमध्ये ठेवतात, परंतु त्यामुळे अंड्याचं बॅक्टेरियापासून संरक्षण करणारा बाहेरील थर निघून जातो

अंडी फ्रिजमध्ये पॅकेजिंगमध्ये किंवा बंद डब्यात ठेवावीत, जेणेकरून ती इतर गोष्टींच्या संपर्कात येणार नाहीत

विशेषत: अंडी दुधासोबत ठेवू नयेत

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण