११ ग्रॅम मेथीच्या दाण्यात ३ ग्रॅम फायबर,३ ग्रॅम प्रोटीन, ३.७२ मिलीग्रॅम आयर्न, २१.२ मिलीग्रॅम मॅग्नेशियम सह अनेक पोषक तत्व असतात.
मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्यास फायदे मिळतात.त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी लाभ मिळतो.केसगळती पासून रुक्ष केस मुलायम होतात.चेहऱ्यावर ग्लो येतो.
मेथी दाण्यांना रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी स्प्रेच्या बाटलीत भरावे आणि रोज केसाच्या मुळांना स्प्रे करावे त्यामुळे केस गळती थांबते.
त्वचेसाठी देखील मेथीच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर करता येतो. स्प्रे करणे आणि कॉटनने त्वचेला हे पाणी लावावे. त्यामुळे त्वचा चमकदार होते. त्वचा हायड्रेट राहिल आणि रुक्षपणा कमी होईल
मेथी दाणे वाटून याला दह्या सोबत केसांना लावावे, केस मुलायम आणि शायनी तसेच मजबूत बनतील.
मेथी दाणे वाटून यात एलोव्हेरा जेल आणि थोडे मथ टाकून चेहऱ्यावर लावावे आणि दहा ते पंधरा मिनिटांना चेहरा स्वच्छ करावा
मेथी दाणे पाण्यात भिजवून सकाळी पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहाते. बॉडी डिटॉक्स होते,त्यामुळे त्वचा चमकदार होते. यामुळे केस मजबूत होतात आणि काही हेल्थ इश्यू असतील तर हे उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.