पांढऱ्या केसांपासून हवी असेल मुक्ती तर नारळाच्या तेलामध्ये मिसळा 'हे' पदार्थ

24 November 2023

Created By : Manasi Mande

केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे बऱ्याच लोकांचे केस पांढरे होतात.

तुम्हालाही अकाली पांढऱ्या केसांचा त्रास सतावतो का ?

याचं उत्तर हो असेल, तर मग काही सोपे, घरगुती उपाय जाणून घ्या.

खरंतर नारळाच्या तेलामध्ये फक्त हे तीन पदार्थ मिसळून लावल्याने पांढऱ्या केसांचा त्रास कमी होऊ शकतो.

नारळाच्या तेलात कढीपत्त्याची पानं टाकून ते गरम करा. गार झाल्यावर तेल केसांना लावा.

खोबरेल तेलामध्ये चार चमचे लिंबाचा रस मिसळून ते केसांच्या मुळांशी लावावे. पांढऱ्या केसांचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.

खोबरेल तेलामध्ये तुरटी मिसळून लावल्यानेही या समस्येपासून आराम मिळू शकतो.